
सरंबळ ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख सरंबळ
सरबंळ गावातील ग्रामपंचायतीची स्थापना १८ जानेवारी १९४१ साली झाली. गावामध्ये सरंबळ, नाईकवाडी, तळेगाव ही तीन महसुली गाव आहेत. हे भारतीय सैनिकांसाठी गाव प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती भारतासाठी सीमेवर लढलेली आहे. देशासाठी लढणा-या या गावाला बारमाही शेती आणि निसर्गरम्य परिसर लाभलेला असून सरंबळ गाव वाळूसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच शेतीप्रधान म्हणूनही प्रसिद्ध असणा-या या गावाने "जय जवान.., जय किसान.." हा नारा अबाधित ठेवला आहे. या गावामध्ये असलेले गावतळेसुद्धा प्रसिद्ध आहे.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.रावजी चंद्रकांत कदम




उपसरपंच
श्री. सागर सुभाष परब
ग्रामपंचायत अधिकारी
श्रीम. अश्विनी ए.कुंभार
गावातील उपक्रम व इतर माहिती


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंदिर परिसरात साफसफाई


सरंबळ जाधववाडी येथील समाजमंदिर


सरंबळ तळयाचा बांध येथील शिलाफलक


महिला बचत गटांच्या माध्यमातुन वनराई बंधारे









